मुख्यपृष्ठ > District > वर्तमान बातमी

श्री संत संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव व तेली समाजातील नगरसेवकांचा सत्कार आज

Shree Sant Santaji Maharaj
२६ डिसेंबर, २०२५ रोजी ०३:३५ PM
श्री संत संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव व तेली समाजातील नगरसेवकांचा सत्कार आज

गडचिरोली : श्री संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव समिती गडचिरोलीच्या वतीने शनिवार, २७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता श्रीसंत संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव व तेली समाजातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहरातील श्री संताजी स्मृती प्रतिष्ठाण कार्यालयात हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी सकाळी १० वाजता श्री संताजी महाराजांची पालखी व मिरवणूक, दुपारी १२ वाजता मान्यवरांचे आगमन व दीपप्रज्वलन होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र विक्री कर न्यायाधिकरण मुंबईचे अध्यक्ष न्या. प्रमोद तरारे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य, प्रा. तुषार दुधबावरे उपस्थित राहतील. दुपारी १.३० वाजता राज रायते व संच यांचा गितांचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर तेली समाजातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार होणार असून दुपारी ३ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभाकर वासेकर, प्रमोद पिपरे, सुरेश भांडेकर, देवाजी सोनटक्के, प्रा. देवानंद कामडी, ॲड. रामदास कुनघाडकर, बाबुराव कोहळे, रवींद्र निंबोरकर, रमेश कांबळे, गोपीनाथ चांदेवार, विष्णू कांबळे, प्रफुल आंबोरकर, भय्याजी सोमनकर, कुणाल भांडेकर, घनश्याम लाकडे, भगवान ठाकरे, रविंद्र ठाकरे, राहुल भांडेकर यांनी केले आहे.

ही बातमी शेअर करा