मुख्यपृष्ठ > District > वर्तमान बातमी

शिवाजी हायस्कूल कुरखेडा येथील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन, मेळाव्याचे ८ जून रोजी आयोजन

orangetimes
२६ एप्रिल, २०२५ रोजी ०४:४४ PM
शिवाजी  हायस्कूल कुरखेडा येथील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन, मेळाव्याचे ८ जून रोजी आयोजन

गडचिरोली : शिवाजी हायस्कूल कुरखेडा येथील सन १९८३ ते १९८६ पर्यंतच्या तीन बॅचमधील विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा ८ जून रोजी आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. विद्यार्थी दशेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळावा, त्या वेळी असलेल्या शिक्षकांबद्दल असलेला आदर प्रसंगातून व्यक्त करावा, यासाठी विविध ठिकाणी व वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जीवनातील अनेक व्यस्त कार्यक्रमांना बाजुला ठेवून जुन्या मित्र-मैत्रिणींना व माजी शिक्षकांना एकत्र आणण्याचा या स्नेहमिलन मेळाव्याचा उद्देश आहे. या मेळाव्यात त्या वेळी असणाऱ्या माजी शिक्षकांचा सत्कार केला जाणार असून माजी विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त करण्यास संधी मिळणार आहे. मेळाव्याच्या सुरुवातीला कुरखेडा शहरात रॅलीचे आयोजन माजी विद्यार्थ्यांनी केले आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आपल्या जोडीदारासह उपस्थित राहण्याचे आवाहन मनिषा भरणे, जयंत हरडे, दिलीप निरंकारी, विनोद सोनकुसरे, सविता वाघरे, निर्मला गोन्नाडे, निलीमा काळे, लीना आकरे, नामदेव बनसोड, अर्चना पांडव, किशोर तलमले, गीता वैद्य, वीरेंद्र मोहबंशी, रवी पोलशेट्टीवार, चित्रलेखा लोणारे, प्रमोद उपासे, विलास आसुडकर, रमेश मडावी, मधुकर मेश्राम, दामोधर अंबादे, यशोधरा सहारे, वासुदेव बैहटवार, प्रेमचंद मच्छिरके आदींनी केले आह

ही बातमी शेअर करा