मुख्यपृष्ठ > Maharashtra > वर्तमान बातमी

एका पत्रकाराच्या लेखणीमुळे ''महाराष्ट्र''

Keshav kumar
१ मे, २०२५ रोजी ०२:५२ AM
एका पत्रकाराच्या लेखणीमुळे ''महाराष्ट्र''

गडचिरोली: आपल्या राज्याला "महाराष्ट्र" हे नाव मिळवून देण्यात एका पत्रकार व प्रसिद्ध साहित्यिकाचा मोठा वाटा आहे त्यांचे नाव प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार असे आहे. एक मे 1960 रोजी राज्याचे पुनर्गठण होऊन मुंबई शहर व मराठी माणसांसाठी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली व याच दिवशी महाराष्ट्र गुजरात स्वतंत्र राज्य निर्माण करण्यास केंद्राने मान्यता दिली. महाराष्ट्र हे नाव आपल्या राज्याला मिळण्यासाठी फार संघर्ष करावा लागला स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील अनेक राज्य हे भाषेच्या आधारावर पुनर्रचित केली गेली होती त्याचबरोबर आपल्या राज्यातही संयुक्त महाराष्ट्र चळवळीने 106 हुतात्म्याचे बलिदान दिल्याने महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. मुंबई प्रांतांचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या कार्यकाळात मराठी भाषिकांवरील अन्याय वाढत गेल्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. मात्र ही चळवळ उभी राहण्यामागे सुप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार व पत्रकार आचार्य प्र.के. अत्रे यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी दैनिक मराठा या वृत्तपत्राच्या माध्यमातून राज्यात मराठी भाषकांचे एकसंघ राज्य व्हावे यासाठी आपली लेखणी झिजवली. एवढेच नव्हे तर 1957 च्या विधानसभा निवडणुकीत आचार्य अत्रे यांनी स्वतः प्रचार करून सत्ताधारी पक्षाला पराभूत करून आपली ताकद दाखवून दिली त्यामुळे केंद्र सरकारला भाषावार प्रांतरचना करून महाराष्ट्र राज्य दिले पाहिजे याची जाणीव झाली. स्वतंत्र मराठी राज्याच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राचे जनक यशवंतराव चव्हाण असले तरी मराठा या दैनिकातील लेखांमुळे जनतेमध्ये वादळ उठले होते. वास्तविक या राज्याचे नाव मुंबई असावे असाच सुर अनेक व्यक्तींनी मांडला होता. तत्कालीन मुख्यमंत्री यांनी स्वतंत्र राज्याचे विधेयक मांडून त्यात मुंबई राज्य व कंसात (महाराष्ट्र) शब्द टाकला होता यावर आचार्य अत्रे यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांविरोधात लिखाण करून जनतेसमोर आपली मते मांडली. मात्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनानंतर मार्च 1960 मध्ये मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून त्यात महाराष्ट्र हेच नाव कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. हे सर्व मराठा या वृत्तपत्रातून आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या लिखाणामुळे व हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी "मावळा" हे टोपण नाव धारण करून संयुक्त महाराष्ट्र चळवळ व्यापक करण्यासाठी व्यंगचित्रे रेखाटल्यामुळे शक्य झाले. आज महाराष्ट्र दिन असल्याने प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विसरणे कदापि शक्य नाही.

ही बातमी शेअर करा